येथे पश्चिम महाराष्ट्रातील, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचा एकमेव सांडपाणी व्यवस्थापनाचा पथदर्शक प्रकल्प आहे यातून सर्व जिल्ह्याला सांड पाण्याचा पूर्णवापर करण्याबाबत प्रोत्साहन दिले आहे.
हे गांव सध्या जल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, गावामधील जे सांडपाणी वाहून जात होते ते पूर्वी ओढ्याला मिळत होते त्याचा पुर्णवापर करुन ते पाणी पुन्हा शेती योग्य करण्याचा खुणगाठ गावाने बांधली आहे. यामूळे गाव जलसाक्षरतेकडे वाटचाल करत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ज्याकाळी परिसरात दुष्काळ होता, त्याकाळी येथे क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड यांचे सह सहकाऱ्यांनी पहिली जलक्रांती आणून हरितक्रांती साधली. त्यामूळे हे गांव पलूस तालुक्यात पुर्वीपासून सधन समजले जाते. साधारण २० हजार लोकवस्तीच्या गावाला पिण्याच्या पाण्याची एक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहे याव्दारे जवळपास १५ छोट्या- मोठ्या गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. प्रथम गावाने संपुर्ण गांव हागंदारी मुक्त करुन केंद्र शासनाकडून जलस्वराज्य योजने अंतर्गत स्वतंत्र अशी "जलस्वराज्य" पेय जल योजना मंजूर केली. ती काही कालावधीतच कार्यन्वित करण्यात आली आहे. याव्दारे शुध्द पाणी नागरिकांना पिण्यास पुरविले जाते. अशा वैविध्यपुर्ण गोष्टींचा गावाने नेहमीच पाठपुरावा केला आहे.